HTML Blockपुरस्कारप्राप्तीसाठी आवश्यक असलेले पात्रता निकष खालीलप्रमाणे

प्रत्येक कुटुंबाने आपल्या बाळासाठी संतुलन गर्भसंस्कार केलेले असावेत. हे संस्कार श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे असावेत.

पुरस्काराचे यावर्षीचे १२वे वर्ष असून १ जानेवारी २०२१ ते ३० जून २०२२ या कालावधीत झाला आहे त्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल.
A]
वडिलांचे पूर्ण नावनिखिल अनिल देशपांडे
आईचे पूर्ण नावश्रद्धा निखिल देशपांडे
बालकाचे पूर्ण नावविदुला निखिल देशपांडे
B]
पिता
जन्म-तारीख पत्ता ईमेल मोबाईल
24/01/1993 D3 - 603, सुंदर समृद्धी अपार्टमेंट, कैलाश जीवन फॅक्टरी जवळ, धायरी नर्हे रोड, धायरी, पुणे,411041 deshpandenikhil1993@gmail.com 9561211165
पिता - 2
शिक्षण लग्न-तारीख व्यवसाय
B. E. Mechanical, MBA 18/06/2018 इंजिनिअर
माता
जन्म-तारीख पत्ता ईमेल मोबाईल
08/08/1993 D3 - 603, सुंदर समृद्धी अपार्टमेंट, कैलाश जीवन फॅक्टरी जवळ, धायरी नर्हे रोड, धायरी, पुणे,411041 shraddhadeshpande1155@gmail.com 9028145598
माता - 2
शिक्षण लग्न-तारीख व्यवसाय
MCA, संगीत विशारद 18/06/2018 गृहिणी
C]
बालक
जन्म-तारीख जन्म वेळ जन्म स्थळ कितव्या आठवड्यात जन्म
27/08/2021 7.32 pm औरंगाबाद 38
बालक - 2
जन्म प्रकार जन्मतः वजन जन्मतः दिसून आलेला विशेष गुण
सीझर 3.365 gm स्थिर नजर, आवाजाच्या दिशेने प्रतिसाद देणे, हसरेपणा
D] गर्भधारणा होण्यापूर्वी घेतलेली काळजी -
पंचकर्म :
मातेने/माता- पित्याने किती दिवस कुठे
मातेने कोरोना काळ असल्याने शक्य नव्हते. -
आहार : केलेले बदल

सात्विक आहार,
चहा - कॉफी चे प्रमाण कमी,
जेवणाच्या वेळा सांभाळणे,
घरगुती जेवण घेणे

औषधे

Pregnancy दरम्यान मी गुजरात मध्ये होते. पंचकर्म शक्य नव्हते त्यामुळे आहारा सोबत मी दिनचर्येत शतावरी कल्प, मसाज तेल, च्यवनप्राश, घरगुती मसाले व संतुलन केशर, गुलकंद वापरून दूध घेणे याचा वापर करायचे.

संस्कार

-

व्यायाम प्रकार

लवकर उठून फिरायला जाणे, प्राणायाम, ध्यानधारणा, योगासने याचा दिनचर्येत समावेश केलेला.

धार्मिक

तेव्हा गुजरात मध्ये वास्तव्य असल्याने नुकतेच गरुडेश्वराचे दर्शन झाले होते व मनात अपार श्रद्धा ठेवून बाळासाठी तयारी चालू केली होती.
नित्य नेमाने देव पूजा करणे, मानसिक शांतता राखणे, श्री गुरुजींचे संगीत ऐकणे हे आवर्जून केले. शोक, चिंता, राग खूप कमी घडू दिले. मन समाधानी, आनंदी, उत्साही ठेवण्याचा प्रयत्न केला.

इतर

गर्भसंस्कार पुस्तकात दिल्या प्रमाणे मनःस्वास्थ्य यावर आम्ही दोघांनीही खूप लक्ष दिले. मूल होऊ द्यायचे आहे यावर एकविचार झाल्यानंतरच गुरुजींच्या नमूद केलेल्या माहिती नुसार अतिशय विनम्र, प्रेमळ व उदात्त भावनेने आम्ही या प्रक्रियेत गेलो. त्यात दोघांनीही आहार विहाराच्या नियमानुसार विचारसरणी व दिनचर्या ठेवली.

E] गर्भधारणेच्या नऊ महिन्यांच्या काळात घेण्यात आलेली काळजी -
संस्कार

अध्यात्मिक आचरण वाढवून गर्भ धारणेपूर्वी व होतानाचे सहवासाचे दिलेले नियम व संस्कार पाळले. सुरुवातीचे काही महिने एकट्याने राहावे लागले परंतु पुस्तकातून, यूट्यूब वरुन जमेल ती काळजी आम्ही घेतली. सातव्या महिन्यात माहेरी व सासरी डोहाळे जेवणाचा संस्कार झाला.

वाचन

काही महिने एकट्याने गेले त्यामुळे सर्व प्रथम कुठलीही समस्या असल्यास, काही कळत नसल्यास, काय करायला हवे हे समजण्यास एकमेव आधार म्हणजे संतुलन गर्भसंस्कार पुस्तकच होते.
त्या व्यतिरिक्त मराठी साहित्य वाचन केले.
अध्यात्मिक वाचनात हरिविजय, भगवद्गीता, गोंदवलेकर महाराजांची नित्य उपासना, रामरक्षा, शिव मानस पूजा, पंधरावा अध्याय, अथर्वशीर्ष याचा समावेश होता.

संगीत

रोज संतुलन चे रोझ ब्युटी मसाज तेल अंगात जिरवून मी व्यायाम करत व अगदी न चुकता श्री गुरुजींच्या आवाजातील संगीत ऐकत असे. अधोरेखित करून सांगावेसे वाटते संपूर्ण गरोदरपणातील ही पक्की वेळ होती जेव्हा बाळ संगीत चालू झाले की फार छान हालचाल करायचे.
अनेकदा मानसिक ताण जाणवला तेव्हा मला स्वतःला हे संगीत, स्तोत्र, मंत्र फार मानसिक शांतता द्यायचे.

आहार

संपूर्ण नऊ महिने घरातील रुचकर, पौष्टिक व ताजा शुद्ध शाकाहारी आहार घेतला.
पुस्तकातील मार्गदर्शनानुसार ठराविक भाज्या, फळे, धान्य यांचा उपयोग केला. रात्रीच्या जेवणात शेवटच्या तिमाहीत जास्तीत जास्त खिचडीच असे.
पुस्तकातील माहिती नुसार शब्दशः पनीर, चीज, छोले, राजमा, मैदा, अती साखर - मीठ, बाहेरचे अन्न प्रकर्षाने टाळले. त्यामुळे पूर्ण गर्भारपणात कधीच पित्त, घबराट, विचित्र काही खाण्याची इच्छा होणे असे कधी घडले नाही.

व्यायाम

सुरुवातीचे तीन महिने फक्त ओंकार जप, प्राणायाम व चालण्याचा व्यायाम जमेल व झेपेल तसा केला.
त्यानंतर रोज पाठ, कंबर, पोट, छाती, खांदे, मांड्या यांचा रोज सकाळी संतुलन रोझ ब्युटी तेलाने हलका मसाज व नंतर श्री गुरुजींच्या आवाजातील संगीत ऐकत व्यायाम असा नियमच चालू केला.
मधले तीन महिने ओंकार जप, ध्यान, प्राणायाम, योगासने, चालणे, घरकामातील उठ-बस वाढवली.
शेवटच्या तीन महिन्यात रोजच्या व्यायामासह पायऱ्या चढणे, उकड बसून करायची कामे केली. चालण्याचा नेम कधीच चुकवला नाही.
आवर्जून सांगावेसे वाटते गरोदर पणात थकवा जाणवतो परंतु पुस्तकात दिल्या प्रमाणे खरंच रोज व्यायामानंतर थकवा कमी होऊन तरतरीत वाटायचे व दिवस छान जायचा.

औषधे

व्यायामात संतुलन चे कोकोनट व रोझ ब्युटी मसाज तेलाचा वापर केला.
रोज सकाळी उपाशी पोटी पंचामृत, गुलकंद घेतले.
सुवर्णजल प्यायले.
झोपताना रोज कोमट दूध, संतुलन शतावरी कल्प, केशर घेतले.
शेवटच्या दिवसात योनी पीचू चा वापर केला.

डोहाळे प्रकार

सुरुवातीचे तीन महिने वरणाच्या वासाने मळमळ व्हायची व डोके दुखायचे. पण पुस्तकातील घरगुती उपायांनी ते कमी व्हायचे.
चौथ्या महिन्या पासून खूप सुखकर व काहीही त्रास न होता संपूर्ण नऊ महिने आनंदात गेले. कोरोना काळात बरेच महिने मी एकटी असल्याने श्री गुरुजींच्या दिलेल्या एकूण एक सूचना खूप मदतीस आल्या.

इतर काही

कोरोना काळात पर राज्यात असताना गरोदर पणाच्या सुरुवातीला जेव्हा आई किंवा मोठे कुणी मला सोबत असावे वाटत होते तेव्हा संतुलनचे गर्भसंस्कार पुस्तक व डॉ. मालविका यांचे व्हिडिओज माझा आधार होते. आयुष्यभर ऋणी राहील असे मार्गदर्शन व उपाय मला यातून मिळाले आहे. घरात मोठ्या बहिणींचे, इतरांचे बाळंतपण झाले पण माझ्या वेळी निरोगी व सहज सोपे महिने बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत पण याचे संपूर्ण श्रेय संतुलन गर्भसंस्कारला आहे.

F] 'संतुलन' संस्कार -
डॉ. बालाजी तांबे यांच्या ' आयुर्वेदीय गर्भसंस्कार ' या पुस्तकाचा वापर -पूर्णपणे
डॉ. बालाजी तांबे यांचे गर्भसंस्कार संगीताचे श्रवण -95-100%
डॉ. बालाजी तांबे यांची संतुलन उत्पादने –

मसाज खोबरेल तेल
रोज ब्युटी तेल
शतावरी कल्प
केशर
गुलकंद
फेमिसेन तेल
संतुलन कुंडलिनी तेल

इतर काही -

चौथ्या महिन्यापासून मी गर्भ संवाद या संकल्पनेचा ध्यान करताना प्रयोग चालू केला व सराव चालू ठेवला. बाळाची पोटातील पहिली हालचाल मला खूप लवकर जाणवली व त्यानंतर रोजच गर्भ संवाद करताना पोटातील हालचाल, प्रतिसाद लक्षणीय होती. अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील रेकॉर्ड तर अतिशय आवडायचे. त्याचे परिणाम आज खूप छान रूपाने दिसतात.

G] बालकाच्या जन्मानंतर :-
सुवर्णप्राशन संस्कार -केला
आहार

संतुलन दिनचर्या गर्भ धारणेपूर्वीच अवलंबली होती त्यामुळे की काय पण बाळाला पूर्ण 8 महिने आईच्या दुधावर ठेवले व विशेष म्हणजे पुरेसे दूध कायमच आले.
त्यानंतर अन्न प्राशन संस्कार केला व पुस्तकातील माहिती व डॉ. मालविका यांच्या व्हिडिओ मधील पाककृती नुसार बाळाला हळूहळू वरचा आहार चालू केला ज्यात पेज, नाचणी सत्त्व, डाळ तांदळाचा रवा, वरणाचे पाणी, उकडलेले फळ असे.
सुरुवातीपासून बाळाला फोन/टीव्ही/कृत्रिम गोड/ खारट पदार्थ/ चॉकलेट/ बिस्कीट असे काहीही दाखवले नाही. जेवणात घरी बनवलेल्या ताज्या, साध्या अन्नाची व चुटपुट खाऊ खाताना फळे, राजगिरा वडी, खजूर, फुटाणे, साळीच्या लाह्या, गूळ पोळी लाडू याची व एका जागी बसून खाण्याची सवय लावली.
आता माझी मुलगी 21 महिन्यांची आहे आणि प्रत्येकाला आश्चर्य वाटते पण ती संपूर्ण जेवण व्यवस्थित करते.
कारल्या पासून अगदी भाकरी, ताकापर्यंत ती सगळे आवडीने जेवते.

औषधे

संतुलन घुटी - श्री गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे बाळाला दीड वर्ष घुटि दिली व कधीच पोटाचे किंवा दात निघतानाचे त्रास बाळाला झाले नाही.
संतुलन बालामृत - याचे गुण मी शब्दात नाही सांगू शकत पण बाळ कमी आजारी पडते, पडले तरी प्रतिकार शक्ती, सहनशक्ती खूप आहे. बुद्धी तल्लख, सात्विक आहे.
बेबी मसाज तेल - यामुळे माझी मुलगी बाळसेदार झाली.
सुवर्ण सिद्ध जल
संतुलन धूप
सॅन अंजन
बाल हर्बल सिरप
बेबी मसाज पावडर

इतर

आज माझ्या मुलीच्या जेवणाच्या सवयी, स्नानाला झाल्यापासून कधीच न रडणे बघून व फार कमी रडण्याचा, हसरा स्वभाव बघून मला कुणी कौतुकाची थाप दिली की मनोमन मी संतुलन गर्भ संस्काराचे कायम आभार मानते. इतरत्र दिसणारे मुलांचे त्रास पाहून व गर्भ संस्कार मुळे आपल्या अपत्यातील वेगळेपण पाहून खूप आत्मिक समाधान मिळते. खरेतर पालकत्व सोप करून मिळालं ते संतुलन मुळेच.

H] मातेची काळजी -
आहार

सव्वा महिना आराम व अभ्यांगासह सुरुवातीला खिरी, नंतर लाडू, हलका पण पौष्टिक, साधा आहार होता.
पुस्तकातील माहिती नुसार आहारात भाज्या, फळे, भाकरी, भात, खिचडी, बाळांतशेप यांचा समावेश होता. सिझर होऊनदेखील कधीच गॅस, अपचन याचा त्रास जाणवला नाही.

औषधे

डिलिव्हरी नंतर कॅल्शियम व लोहाच्या औषधी होत्या त्याशिवाय कधीच काही औषध घ्यावे लागले नाही.

संतुलन उत्पादने

शतावरी कल्प
संतुलन मसाज तेल (तीळ)
धूप

व्यायाम

डिलिव्हरी नंतर हळू हळू चालण्याचा व श्वसनाचे व्यायाम केले. बाळ वाढीला लागले तसे व्यायाम प्रकार वाढवले व आज दीड वर्षातच वजन, कांती, शक्ती पुन्हा पूर्ववत आहे.

इतर काही

डिलिव्हरी साठी कळा चालू झाल्या व त्या 26 तास सहन केल्या. नऊ महिने केलेला व्यायाम व श्वसनाचे प्रकार याची किमया म्हणा परंतु कळा चालू असताना एकदाही रडणे/ ओरडणे/ भीती हा प्रकार माझ्याकडून घडला नाही. अगदी वेळेला बाळाचे ठोके कमी भरून गळ्या भोवती नाळ असल्याने बाळ पुढे सरकायचे पण थकून आत शी झाली व सिझर करावे लागले. पण एकंदर प्रसूतीचा काळ मानसिक व शारीरिक रित्या सुकर गेला. मनःस्वास्थ्य व त्यावर पाळलेली शिस्त त्यावेळी खूप कामी आली. आदरणीय गुरुजी बालाजी तांबे यांनी फार मोठा आरोग्याचा ठेवा आम्हाला दिलाय.

I] बालकाच्या प्रगतीचे टप्पे –
HTML Blockतुमच्या बालकाच्या प्रगतीचे टप्पे सांगण्यासाठी खालील तक्त्यामध्ये क्रिया व त्यासमोर पर्याय दाखवले आहेत. हे टप्पे कधी सुरु झाले याबाबत आपण योग्य त्या पर्यायाचे तपशील लिहा.
क्रिया(दिवस/आठवडे/महिने/वर्ष)
टक लावून पाहणे कुशीवर होणे पालथे पडणे पुढे सरकणे रांगणे
तीन दिवस एक आठवडा अडीच महिने सहावा महिना बाळ गुटगुटीत असल्याने आठव्या महिन्यात रांगले
क्रिया(दिवस/आठवडे/महिने/वर्ष) - 2
दात येणे बोबडे बोलणे (Babbling) शब्द बनवणे छोटी वाक्ये बनवणे उभे राहणे (आधाराने)
सहावा महिना चौथा महिना सातव्या महिन्यात छोटे छोटे शब्द उच्चारले अठरा महिने (आज 21 महिन्यांच्या वयात माझी मुलगी संपूर्ण वाक्य बनवून संवाद साधते) दहावा महिना
क्रिया(दिवस/आठवडे/महिने/वर्ष) - 3
उभे राहणे (स्वतंत्रपणे) चालणे (आधाराने) चालणे (स्वतंत्रपणे) चढणे पळणे
बारावा महिना तेरावा महिना चौदावा महिना पंधरावा महिना अठरावा महिना
आपल्या बालकाच्या प्रगतीचे टप्पे दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप्स या फॉर्म सोबत जोडावेत.
HTML Blockब] बौद्धिक विकास - आपल्या अपत्याच्या वयोगटातील इतर मुलांचा विचार करता पुढील गुणधर्म तुमच्या बालकामध्ये किती प्रमाणात आढळले?
गुणधर्म
स्मरणशक्ती आकलन वयानुसार समज सहनशीलता
अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात
क्रिया(दिवस/आठवडे/महिने/वर्ष) - 3
निरीक्षण समायोजन नवनिर्मिती इतरांशी जुळवून घेणे
अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात
J] मनोगत :
मनोगत

सर्वप्रथम आम्ही दोघेही संतुलनचे मनःपूर्वक आभारी आहोत की आमचा पालकत्वाचा प्रवास म्हणजे आम्हाला आयुष्यभराची एक मोठी भेटच ठरली. सुरुवातीपासून ते आज घडीला नियम पाळताना अनेकदा टीकाही ऐकावी लागते परंतु बाळाच्या वागण्यातील, स्वभावातील गुण बघून जेव्हा इतर बोलतात की " ती मुळातच शांत आहे म्हणून तुम्हाला सोपे जाते, आमचं बाळ अस नाही" तेव्हा कोणत्या शब्दात समजावून सांगावे की बाळ कसे असावे व व्हावे हे गर्भ संस्कार च्या मदतीने साध्य करता येते. श्री गुरुजींनी राष्ट्रासाठी, समाजासाठी उत्कृष्ट, सात्विक भावी पिढी निर्माण करण्याचे जादूचे पुस्तकच लिहिलेले आहे. 😀त्याचा वापर समाजातील प्रत्येकाने करणे खरंच खूप गरजेचे आहे.
आपल्या अपत्याला सद्गुणांची ठेव देताना जे समाधान मिळते ते खूप अनमोल आहे. गर्भ संवाद, संतुलन बाळगुटी, बालामृत यासारखा खजिना अगदी सामान्यांना देखील उपलब्ध करून दिला त्यासाठी खूप धन्यवाद. आपल्या भारतातील आयुर्वेद व धर्म शास्त्र, त्याची महती, उपयोग हे सगळीकडे फक्त तुमच्यामुळे पसरत आहे जे खूप बहुमूल्य आहे. 🙏
समाजातील नकोसे प्रकार बघून असे वाटायचे की आपले बाळ कसे घडवायचे, वाढवायचे?
या मोठ्या प्रश्नाचे उत्तर संतुलन आयुर्वेद गर्भ संस्कार मध्ये सापडते. ही बाळे घडवताना, जपताना आम्हा पालकांची जडण - घडण होते. चांगल्या सवयी, आनंदी कुटुंब, सात्विकता, प्रेमळपणा व समाजाप्रती आपली बांधिलकी व जबाबदारी या गोष्टी आम्हा मोठ्यांकडूनही ओघाने घडतात. 🙂
पुन्हा एकदा खूप खूप आभार!