तुम्ही पुरस्कारासाठी प्रवेशअर्ज भरताना आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे योग्य प्रकारे द्या जेणेकरून त्यावर आम्ही तुमच्या बाळाची वाढ ही श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी नमूद केलेल्या गर्भसंस्कार नियमांना, मापदंडाना धरून झाली आहे का हे आमच्या लक्षात येईल व त्यावरूनच सुदृढ बाळाची योग्य ती निवड केली जाईल.
तुम्ही सोहळ्यासाठी दाखवलेल्या उत्साहाची आम्ही प्रशंसा करतो. हा सोहळा जे कुटुंब आपल्या बाळाच्या जन्माच्या आधीपासून संतुलन गर्भसंस्कार करत आहेत अशा सर्वांसाठी आहे. आपण सुद्धा आपल्या बाळाच्या प्रसूतीसाठी संतुलन गर्भसंस्कारांप्रमाणे नियमांचे पालन करावे आणि बाळाचे नाव पुरस्कारासाठी नाव भविष्यात नोंदवावे.
गर्भसंस्कार च्या अपॉइंटमेंट करिता इथे क्लिक करा
संतुलन आयुर्वेदीय गर्भसंस्कार विषयी अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
हा पुरस्कार सोहळा आई वडील झालेल्या कुटुंबासाठी आहे ज्यांनी आपल्या बाळाच्या प्रसूतीसाठी संतुलन गर्भसंस्कार केलेले आहेत. ज्यांना भविष्यात आई वडील होण्याची इच्छा आहे किंवा ज्यांची नुकतीच लग्ने झालेली आहेत ते आमच्या पुढच्या गर्भसंस्कार वेबिनारला उपस्थित राहू शकतात. या वेबिनार मधून आपण आपले प्राचीन प्रसूतीशास्त्र व प्रसूतीचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल माहिती घेऊ शकता तसेच प्रसूती पूर्व अवस्था , गर्भवती अवस्था आणि प्रसूती पश्चात अवस्था या सर्व काळात आई वडीलांनी कशी आणि कोणती काळजी घ्यायची याबाबत सविस्तर माहिती दिली जाते.
संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करणे हा एकच पर्याय असून आपल्याला याबाबत काही शंका ,प्रश्न असतील तर आपण आमच्या ९६८९९२६००२ यावर संपर्क किंवा व्हॉट्सॲप करू शकता garbhasanskar@santulan.in यावर इमेल करू शकता.
नाही, हा सोहळा हा पुर्णपणे मोफत आहे.
आपण एक आई वडील म्हणून आपल्या बाळावर संस्कार करण्यासाठी आजपर्यंत खूप काही केले आहे त्यामुळे आपल्याही पाठीवर एक शाबासकीची थाप पडावी, आपले कौतुक व्हावे आणि गर्भसंस्कार हा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा या विचाराने आम्ही हा कौतुक सोहळा सुरू केला आहे त्यामुळे यासाठी काहीही शुल्क आकारले जाणार नाही आहे.